२ ऑक्टोबर २०२६ हा दिवस कोतवालवाडी ट्रस्टसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला. डॉ. प्रकाश आमटे सर आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी कोतवालवाडी ट्रस्ट, नेरळ येथे भेट दिली. 🙏
गेली ७५+ वर्षे आमटे परिवार समाजातील दुर्लक्षित घटक, महारोगी, तसेच दुर्गम भागातील आदिवासी समाजामध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे कार्य करत आहे. थोड्याफार फरकाने, कोतवालवाडी ट्रस्टमध्येही आदिवासी मुलांना शिक्षण आणि आदिवासी महिलांना नर्सिंग व शिवण अशा प्रशिक्षणांतून स्वावलंबी बनविण्याचे काम सुरू आहे.
हे काम बघून डॉ. प्रकाश आमटे सर भारावून गेले आणि त्यांनी संस्थेचे मनापासून कौतुक केले.
कोतवालवाडी ट्रस्टच्या मॅनेजिंग ट्रस्टी माननीय संध्याताई देवस्थळे यांच्या समवेत शेखर भडसावळे, सावळाराम जाधव, डॉ. दिलीप नेहेरकर, अनसूया पादिर आदी सर्व ट्रस्टींनी त्यांचे आभार मानले. कोऑर्डिनेटर भारती शिंगोले, अभिश्री आणि अभिषेक कांबळे, तसेच सर्व शिक्षिका देखील भारावून गेल्या.
तसेच डॉ. राकेश पाटील, डॉ. रवी गर्जे, ट्रस्टी बालकृष्ण पादिर, परमेश्वर शेप, श्री. कुलकर्णी आणि वसतिगृहातील मुले, तसेच नर्सिंग प्रमाणपत्र मिळालेल्या विद्यार्थिनी यांना प्रबोधन केले गेले.



GDA प्रमाणपत्र वितरण
याच दिवशी ५२ विद्यार्थिनी GDA (General Duty Assistant) – Level 4 ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्या. सर्व विद्यार्थिनींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते NSDC प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. सर्व विद्यार्थिनींचे खूप खूप अभिनंदन! 🎉




