स्वातंत्र्यसैनिक रामलाल श्रीवास्तव आणि हरिभाऊ भडसावळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोतवालवाडी ट्रस्टकडून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. 🙏
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात या दोघांनी आपल्या तांत्रिक ज्ञानाचा उपयोग करून आझाद दस्ता गटाला मोलाची साथ दिली. ब्रिटिशांची सत्ता खिळखिळी करण्यासाठी आझाद दस्ता गटाने वीजवाहक पायलन कापून वीजपुरवठा खंडित केला आणि इंग्रजी राजवटीला जबर धक्का दिला. या लढ्यात सर्वांनी आपले प्राण पणाला लावले.
अशा थोर क्रांतिकारकांच्या त्याग आणि बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेत आहोत. त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.
स्मरण सभा
कोतवालवाडी ट्रस्टमध्ये या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. ट्रस्टच्या विद्यार्थिनी व सदस्यांनी एकत्र येऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.


या स्मरण सभेची झलक पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहा, तसेच अधिक छायाचित्रांसाठी हा छायाचित्र संग्रह पहा.

