हुतात्मा वीर भाई कोतवाल आदिवासी मुलांचे अनुदानित वसतीगृह
कोतवालवाडी ट्रस्ट, नेरळ, ता. कर्जत, जि. रायगड — पिन ४१०१०१
इयत्ता पाचवी ते दहावीच्या
वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांसाठी
मोफत प्रवेश
शैक्षणिक वर्ष २०२६-२७
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख
७ जून २०२६

हुतात्मा भाई कोतवाल वसतीगृह, नेरळ
कोण अर्ज करू शकतो?
कर्जत तालुक्यातील नेरळ येथील कोतवालवाडी ट्रस्ट या सेवाभावी संस्थेच्या हुतात्मा भाई कोतवाल आदिवासी विद्यार्थी वसतीगृहामध्ये पुढील प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे:
- आदिवासी व मागासवर्गीय विद्यार्थी
- अनुसूचित जात व अनुसूचित जमाती
- विमुक्त जाती भटक्या जमाती (वि. जा. भ. ज.)
- विशेष मागास प्रवर्ग (वि. मा. प्र.)
- इतर मागास अपंग (दिव्यांग) विद्यार्थी
- अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थी
महत्त्वाची माहिती
प्रवेश पात्रता
इयत्ता ५ वी
इ. ४ थी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी
इयत्ता १० वी
इ. ९ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी
प्रवेश अर्ज कोतवालवाडी ट्रस्टच्या कार्यालयात मोफत मिळतील
निवासी वसतीगृहाची सुविधा
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्कृष्ट सुविधा
स्वतंत्र इमारत
निवासाकरीता स्वतंत्र सुसज्ज इमारत
विनामूल्य राहणे व जेवण
राहण्याची व जेवण्याची संपूर्ण सोय
विनामूल्य गणवेश
शाळेचा संपूर्ण गणवेश मोफत दिला जातो
शैक्षणिक साहित्य
विनामूल्य शैक्षणिक व निवासी साहित्य
सुसज्ज ग्रंथालय
पुस्तके व अभ्यासाची उत्कृष्ट सोय
भव्य खेळाचे मैदान
खेळाचे मैदान व आवश्यक साहित्य
वैयक्तिक लक्ष
प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष
समाज कल्याण अनुदानित
शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून अनुदानित
आवश्यक कागदपत्रे
विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला (स्वत:च्या नसल्यास वडिलांचा)
पालकांचा उत्पन्नाचा दाखला
रहिवासी दाखला (सरपंच/पोलिस पाटील)
शाळा सोडल्याचा दाखला (झेरॉक्स)
विद्यार्थ्यांच्या आधीच्या मार्कलिस्ट
पासपोर्ट साईज फोटो (५ प्रती)
आधारकार्ड
अपंग (दिव्यांग) असल्यास सक्षम प्राधिकान्याचे अपंग प्रमाणपत्र
प्रवेशासाठी आरक्षण
अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती
अपंग प्रवर्ग (दिव्यांग)
विमुक्त जाती व भटक्या जमाती
विशेष मागास प्रवर्ग
अर्ज कोठे मिळतील?
प्रवेश अर्ज कोतवालवाडी ट्रस्टच्या कार्यालयात मिळतील.
कोतवालवाडी ट्रस्ट, नेरळ, ता. कर्जत, जि. रायगड — पिन ४१०१०१
अधिक माहितीसाठी संपर्क करा
खालील अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधा किंवा वसतीगृहास भेट द्या
मॅनेजिंग ट्रस्टी
श्रीम. अनसुया पादीर
उपसंचालक
श्री. सावळराम जाधव
विश्वस्त
श्रीमती संध्याताई देवस्थळे
विश्वस्त
श्री. रामचंद्र ब्रह्माडे
विश्वस्त
श्री. चंद्रशेखर भडसावळे
अधिक्षक
श्री. ए. वी. झुगरे
कोतवालवाडी ट्रस्ट, नेरळ, ता. कर्जत, जि. रायगड, पिन — ४१०१०१
संपर्क पृष्ठ